यशवंत मराठे - लेख सूची

शिक्षणाच्या आईचा घो

कुठल्याही माणसाचा आयुष्याचा उद्देश काय असतो? आजच्या जगात पैशाला इतके महत्त्व आले आहे की पैसा मिळवला म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पैसे मिळविण्याकरिता शिक्षण सगळ्यात महत्त्वाचे आहे असे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात येते.  गेले काही वर्षे शिक्षणाचा जो काही खेळखंडोबा चालला आहे तो आपण सगळे बघतोच आहोत. काहीही करून मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याची …

न्यायव्यवस्था, नीती आणि मानसिकता

आज भारताची लोकसंख्याच इतकी आहे की जवळजवळ रोजच बलात्काराची बातमी वाचायला मिळते. बातमी आली की लगेच “पोलीस काय झोपा काढतात का?” अशी ओरड सुरू होते. आपल्याला कल्पना आहे का की संयुक्त राष्ट्रसंघाच्या (United Nations) स्टँडर्ड्सनुसार दर १००,००० लोकसंख्येला २३० पोलीस असायला हवेत. भारतात पोलिसांची ही संख्या फक्त १२५ आहे. ही संख्या जगातील सर्वात कमी श्रेणीत …

भारतीय दांभिकता

काही वर्षांपूर्वी मी एक बातमी वाचली होती, एका १२ वर्षाच्या मुलाची. एका लग्नाच्या वरातीतील गाडीने त्याच्या सायकलचे नुकसान केले. जेव्हा त्याने आपले चाक दुरुस्त करण्यासाठी भरपाई मागितली तेव्हा काय झाले? वरातीतील लोकांना तो त्यांचा अपमान वाटला, त्या मुलाला मारहाण झाली आणि जवळच असलेल्या शेतात त्याला जाळून ठार मारले. ही कहाणी तेथील प्रादेशिक वर्तमानपत्रात फक्त उल्लेखण्यात …

अंत्यसंस्कार

पुरातत्त्ववेत्त्यांनी शोधलेल्या खूप जुन्या काळातल्या सामुदायिक दफनभूमी पाहता, अग्नीचा शोध लागायच्या आधी सर्व खंडांतील, सर्व प्रकारच्या मानव समुदायांनी मृतदेहांना एखाद्या झाडाखाली, गुहेमध्ये अथवा विवरामध्ये ठेवले असेल. पालापाचोळा आणि फारतर काही फांद्या इत्यादींनी ते मृतदेह झाकले असतील. कारण ‘खोल खोदणे’ हेसुद्धा मानवाच्या त्या आदिम अवस्थेमध्ये, अवजारांच्या अभावी सहज शक्य नसणार. बहुसंख्य ठिकाणी आपापल्या टोळीची जिथे जिथे …

दुतोंडी आणि दुटप्पी

राजकारणी लोक किती सोयीस्कर टोप्या बदलतात आणि स्वतःच्या किंवा आपल्या पक्षाच्या अथवा आपल्या सरकारच्या स्वार्थी मतलबासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतात याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण हे गेले एक वर्ष देऊ शकेल. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना महामारीची सुरुवात झाली आणि सुमारे महिन्याभरातच सुन्नी मुसलमानांच्या तबलिगी जमात या आंतरराष्ट्रीय धर्मप्रसार संस्थेचे संमेलन दिल्लीत व्हायचे होते. सुमारे पाच हजार …

स्थलांतरित मजूर आणि झुंडशाही

बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा, तेलंगणा इत्यादी राज्यांतील नागरिक स्थानिक सुरक्षा व्यवस्था आणि बेरोजगारी याला कंटाळून आपल्या राज्यांतून पलायन करतात. आज मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांत असणार्‍या रोजगाराच्या संधी या लोकांना तेथे आकर्षित करतात. मुंबई तर भारताचे व्यावसायिक उर्जास्थान आहे. परंतु शहरांच्या पायाभूत सुविधांवर ह्या लोंढ्यांचा प्रचंड दबाव येऊन ही शहरे लोकांच्या ओझ्याखाली गुदमरू लागली आहेत. अशा …

कोरोनानंतरचे जग – स्वैर अनुवाद – यशवंत मराठे

Original Article Linkhttps://amp.ft.com/content/19d90308-6858-11ea-a3c9-1fe6fedcca75 Yuvan Harari is the author of ‘Sapiens’, ‘Homo Deus’ and ‘21 Lessons for the 21st Century’ मानवजात एका जागतिक संकटाला सामोरी जात आहे. कदाचित आपल्या हयातीतील हे सर्वात मोठे संकट असेल. येत्या काही आठवड्यांत लोकांनी आणि सरकारांनी घेतलेले निर्णय, पुढील काळात जगाला कलाटणी देणारे किंवा बदल घडवून आणणारे ठरतील. त्याचा प्रभाव केवळ …